भाजपा राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे यांचा श्री फाउंडेशनतर्फे सन्मान


BJP State Council Member Pramod Savkare honored by Shree Foundation भुसावळ (14 जुलै 2025) : भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य म्हणून निवड करण्यात आल्यानंतर त्यांचा शहरातील श्री फाउंडेशनचे अध्यक्ष सारंगधर पाटील (छोटू भाऊ), सचिव मनीष सारंगधर पाटील यांनी कार्यालयात भला मोठा बुके देवून सन्मान केला.

भाजपाने अलीकडेच राज्य परिषद सदस्यांची निवड जाहीर केल्यानंतर त्यात भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांचीदेखील निवड केल्याने या सन्मानाची दखल घेत हॉटेल व्यावसायीक सारंगधर पाटील व भाजपा युवा मोर्चाचे मनीष पाटील यांनी त्यांचा सहृदय सत्कार करीत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंदार भोईटे उपस्थित होते.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !