भुसावळात भाजपा महाराष्ट्र राज्य परिषदेवर निवड झालेल्या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार
भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जळगाव पूर्वचा स्तुत्य उपक्रम
Newly elected members of BJP Maharashtra State Council felicitated in Bhusawal भुसावळ (14 जुलै 2025) : शहरातील सुरभी नगरातील मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयात भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जळगाव पूर्वच्या वतीने भाजपा महाराष्ट्र राज्य परिषदेवर निवड झालेल्या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
बुके ऐवजी रोपे देवून सन्मान
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड़ मां के नाम’ या संकल्पनेतून सर्व मान्यवरांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा महाराष्ट्र राज्य परिषदेवर निवड झालेल्या हिरालाल चौधरी, मधुकर राणे, गोमती बारेला तसेचछत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार प्राप्त विकासजी अवसरमल, भुसावळातील भाजपाचे शहराध्यक्ष संदीप सुरवाडे (उत्तर विभाग), किरण कोलते (दक्षिण) यांचा मान्यवरांनी सत्कार केला.



यांची होती उपस्थिती
अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नागेश्वर साळवे यांनी प्रास्ताविक तर भाजपा सरचिटणीस प्रशांत निकम (सरचिटणीस) यांनी सूत्रसंचालन केले. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जळगाव पूर्व जिल्हा सरचिटणीस अर्जुन वाघ, जिल्हा उपाध्यक्ष धनराज बाविस्कर, कैलास सुरवाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख चेतन सावकारे, नगरसेवक कैलास नरवाडे, सुभाष सुरवाडे, बबलू घारू, अनिल डांबरे, संतोष ठोकळ, रवींद्र दाभाडे, प्रेमचंद तायडे, राकेश सपकाळे, रवींद्रनाथ खरात, भरत उमरिया, विशाल गव्हाळे, विनोद वाघोदे, सुरेंद्र पालवे, किरण सोनवणे, संतोष मेढे, संजय वाघ, बाळू इंगळे, योगेश जोहरे, राजेश साळुंके, किरण वसंत सोनवणे, नगीन वाघ, आकाश भालेराव, मयुर लोणारी आदींची उपस्थिती होती. आभार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे यांनी केले.





