प्रवाशांनी भरलेली जीप नदीत कोसळून आठ प्रवासी ठार

पिथोरागड/उत्तरप्रदेश (15 जुलै 2025) : युपीच्या पिथोरागडमध्ये प्रवाशांनी भरलेली जीप नदीत कोसळल्याने आठ जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर बचावकार्य सुरु करण्यात आलं आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
काय घडले नेमके
उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणारी एक मॅक्स जीप नियंत्रण गमावून 150 मीटर खोल नदीत कोसळली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शाळकरी मुलीसह चार महिलांचा समावेश आहे. तर पाच जण जखमी आहेत. जीपमध्ये एकूण 13 प्रवासी होती. अपघाताची बातमी पसरताच परिसरात शोककळा पसरली आणि स्थानिक लोकांनी प्रशासनासह तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना दरीतून बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, मृतांची अद्याप ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.