आडगाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना पाच टक्के निधीतून जीवनावश्यक साहित्याचे वाटप

यावल (16 जुलै 2025) : यावल तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायतीत ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नापैकी पाच टक्के निधी दिव्यांगांवर खर्च करण्यात आला आहे. या निमित्त मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात गावातील सर्व दिव्यांग बांधवांना बोलावून त्यांना जीवनावश्यक साहित्य, किराणा साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
आडगाव ता. यावल येथील ग्रामपंचायत मध्ये मंगळवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सरपंच आमीना रशीद तडवी, उपसरपंच प्रतिभा सुनिल पाटील,सदस्या दिपक पाटील,रूपाली पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायतच्या एकूण उत्पन्नापैकी पाच टक्के निधीतून गावातील दिव्यांग बंधू, भगिनींकरिता जीवनावश्यक वस्तू तसेच किराणा साहित्याचे किट तयार करून त्यांना वाटप करण्यात आले. ग्रामपंचायती कार्यालयामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात योगेश पाटील, सुवर्णा पाटील, याकूब तडवी, सायबु तडवी, विकास पाटील, ललिता पाटील सह आदींची उपस्थिती होती. दिव्यांग बांधवांना सन्मानाने ग्रामपंचायत मध्ये आमंत्रण देऊन पाच टक्के निधीतून विविध प्रकारचे किराणा साहित्य घेण्यात आले होते व जीवनावश्यक वस्तू घेण्यात आल्या होत्या. त्यांचे किट तयार करण्यात आले होते. व ते कीट वितरण करण्यात आले.