परसाडे बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य अपात्रतेचा आदेश नाशिक अपर आयुक्तांकडून रद्द


यावल (16 जुलै 2025) : यावल तालुक्यातील परसाडे बुद्रुक ग्रामपंचायत सदस्यांना ा तिसर्‍या अपत्य प्रकरणी जळगाव जिल्हा अधिकारी यांनी अपात्र ठरवले होते. तर या निकालास नाशिक विभागीय अप्पर आयुक्तांकडून रद्द करण्यात आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण
परसाडे बुद्रुक ता.यावल ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्य खाल्लोबाई युनुस तडवीयांच्या विरोधात कमाल कान्हा तडवी पडसाळे बुद्रुक तालुका यावल व ग्रामसेवक पडसाळे बुद्रुकयांनी जिल्हा अधिकारी कार्यालयात तिसर्‍या अपत्या वरून त्यांना अपात्र करावे या संदर्भात केस दाखल केली होती त्याचा निकाल जिल्हा अधिकारी जळगाव यांनी दिला होता त्यात खंल्लोबाई तडवी यांना अपात्र केले होते जिल्हा अधिकारी यांच्याकडील 30 डिसेंबर 24 रोजी दिलेल्या निकालाच्या विरोधात खल्लो बाई तडवी यांनीअपर विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होती जिल्हाधिकारी कार्यालयातील देण्यात आलेल्या निकालाच्या विरोधात प्रभावी मुद्दे नाशिक विभागीय अप्पर आयुक्तांकडेअपिलात उपस्थित केलेत त्यातवैद्यकीय अधिकारी यांचे अहवालात बालकाचे नाव तसेच जन्म तारखे मध्ये फरक दिसून येत आहे नावांमध्ये फरक आहे.


ग्रामसेवक परसाडे यांच्या 25 मार्च 2025 रोजीच्या दाखल्यानुसार 2012 या जन्म नोंदणी रजिस्टर चे प्रत्यक्ष जन्म रजिस्टर पडताळणी केली असता किंवा शोधावळ केली असता सदर जन्म नोंद आढळून येत नसल्या बद्दल नमूद केले आहे त्यानुसार तिसर्‍या अपत्याबाबत शंका निर्माण होते त्याबद्दल जिल्हाधिकारी जळगाव यांनी येथे चौकशी करून नव्याने आदेश पारित करणे उचित होईल असा निष्कर्ष आयुक्त यांनी काढलेला असून अपीलार्थी यांचे अपील अंशतः मान्य करण्यात आले व जिल्हाधिकारी जळगाव यांच्या 30 डिसेंबर 2024 रोजी चा पारित केलेला आदेश अंशतः रद्द करण्यात आला असा आदेश अजय मोरे अपर विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांनी दिल्यामुळे खल्लोबाई तडवी यांना दिलासा मिळाला आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !