धुळ्यात वास्तव्य लपवून राहणार्‍या चौघा बांग्लादेशींना नऊ महिन्यांची शिक्षा

धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा यशस्वी तपास : संशयीतांना सहा हजारांचा दंड


गणेश वाघ

Four Bangladeshis living in hiding in Dhule sentenced to nine months धुळे (16 जुलै 2025) : धुळ्यातील गुन्हे शाखेचे डॅशिंग पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना न्यु शेरेपंजाब लॉजमध्ये बेकादेशीररित्या वास्तव्य करणार्‍या चौघा बांग्लादेशींची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने 22 डिसेंबर 2024 रोजी छापेमारी करीत संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींना न्यायालयाने नऊ महिन्यांची शिक्षा व सहा हजारांचा दंड सुनावला.


या संशयीतांना झाली अटक
महंमद मेहताब बिलाल शेख (48), शिल्पी बेगम महंमद बेताब शेख (43, रा.मानकुर इंदिरानगर, हाऊस नं.185, ग.नं.3, मुंबई मूळ रा. चरकंदी पो.निलुखी पोलीस ठाणे, सिपचर, जि.महिदीपुर, बांगलादेश), ब्युटी बेगम पोलस शेख (45, रा.ग.नं.ए/55, पलकपुर, दिल्ली, मुळ रा.बेहेनातोला पोलीस ठाणे सिपचर, जि.महिदीपुर, बांगलादेश) व रिपा रफीक शेख (30, रा.302, कबीर वस्ती, रोशन वाली गल्ली, दिल्ली मुळ रा.श्रीकृष्णादी पो. कबीरस्पुर पोलीस ठाणे, राजुर जि. महिदीपुर, बांगलादेश) यांना अटक करण्यात आली होती. नागरिकांना अटक केली. संशयीतांकडे दिल्ली, मुंबई, बंगळूरातील पत्त्याचे बनावट आधार कार्ड मिळाल्यानंतर ते जप्त करण्यात आले तसेच मोबाईली जप्त करण्यात आले होते.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळ्यातील न्यु शेरेपंजाब लॉजमधील रूम नं.122 मध्ये वैध कागदपत्राशिवाय काहीजण बेकायदेशिररित्या राहत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर रविवार, 22 डिसेंबर 2024 रोजी कारवाई करण्यात आली होती.

आरोपींना नऊ महिन्यांची शिक्षा
धुळ्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या तपासानंतर धुळे न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले व न्यायालयाने आरोपींना नऊ महिन्यांची शिक्षा व सहा हजारांचा दंड सुनावला. तपासाधिकारी म्हणून धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी काम पाहिले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !