धुळ्यातील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा जिल्हा समन्वयक एसीबीच्या जाळ्यात


District Coordinator of Annasaheb Patil Economically Backward Development Corporation in Dhule caught by ACB धुळे (16 जुलै 2025) : शहरातील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकाला पाच हजारांची लाच घेताना धुळ्यातील एसीबी पथकाने अटक केली. या कारवाईने लाचखोर प्रचंड हादरले आहेत. शुभम भिका देव (28, रा.प्लॉट नंबर 11 अ, आदर्श नगर वडेल रोड, देवपूर, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्याकडून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत रोजगाराकामी जेसीबीसाठी कर्ज मिळण्यासाठी पात्रता प्रमाणपत्र घेऊन इंडसइंड बँकेकडून 24 लाख 96 हजार रुपये वैयक्तिक कर्ज घेऊन जेसीबी खरेदी केले होते. तक्रारदाराने जेसीबी घेण्याकरिता घेतलेल्या कर्जाच्या परतफेडतील व्याजाच्या रकमेच्या परतावा मिळण्यासाठी प्रस्ताव महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यासाठी आरोपीने ाच हजारांची लाच मागली केली तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली व कार्यालयाच्या बाहेर लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले.


यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई धुळे पोलिस सचिन साळुंखे, पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, चालक जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने केली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !