भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात ‘स्टडी हॅबिट्स’ विषयावर परिसंवाद


भुसावळ (17 जुलै 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात ‘संवाद समाजाशी’ या अंतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी हॅबिट्स अर्थात अभ्यासाच्या सवयी या संदर्भात जळगाव आणि वरणगाव येथील तज्ञ नामांकित, प्रथितयश डॉ.सचिन देशपांडे, प्रीती पाटील, डॉ.राहुल भोईटे, डॉ.नितीन धांडे आदींच्या उपस्थितीत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे अध्यक्षस्थानी होते.

प्रास्ताविकात बी.बी.जोगी यांनी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातनू मनाची कौशल्ये विकसित करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डॉ.. राहुल भोईटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना जीवनात यशस्वी व्यक्ती होण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी करू नये या संदर्भात तसेच मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण मनाच्या सहाय्याने स्वतःला कसे भक्कम बनवले पाहिजे या संदर्भात अत्यंत मनोरंजक पद्धतीने मार्गदर्शन केले.


विद्यार्थ्यांशी विविध प्रश्न आणि उत्तरांच्या माध्यमातून संवाद साधून विद्यार्थ्यांनी सुरक्षित भविष्याच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या मनाला कसे परिपक्व बनवले पाहिजे या संदर्भात तपशीलवार विवेचन केले. याप्रसंगी एका मानसशास्त्रीय चाचणीचे सुद्धा आयोजन विद्यालयात करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी चाचणीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. तसेच याप्रसंगी सर्व डॉक्टर्स मंडळींनी विद्यालयातील सर्व शिक्षकांशी सुद्धा संवाद साधला.

प्रसंगी विद्यालयातील पर्यवेक्षिका संगीता अडकमोल, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, एस.पी.पाठक, बी.बी.जोगी, नितीन पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शैलेंद्र वासकर, शैलेंद्र महाजन, संदीप पाटील, सुहास चौधरी, वैशाली महाजन, निलेश नेहेते, प्रदीप सपकाळे, नवीन नेमाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन बी.बी.जोगी आणि सुरेश कापसे यांनी केले. सूत्रसंचालन रेणुका क्षीरसागर आणि उन्नती चौहान या विद्यार्थिनींनी तर आभार सुनील पाठक यांनी मानले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !