भुसावळात ‘नानी बाई का मायरो’ कथेचे आयोजन
26 ते 28 तीन दिवसीय भक्तिमय कार्यक्रम : श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात आयोजन

भुसावळ (17 जुलै 2025) : अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन भुसावळ शाखेतर्फे ‘नानी बाई का मायरो’ या भावपूर्ण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. 26 ते 28 जुलै दरम्यान तीन दिवस चालणार्या या भक्तिमय कार्यक्रमाचे कथावाचन श्रीधाम वृंदावनचे पूज्य योगेश बृजवासी महाराज करतील.
असे आहे कार्यक्रमाचे स्वरूप
कथेचा पहिला दिवस शनिवार, 26 जुलै रोजी मायरोचे महत्त्व, भगवान शंकर-पार्वती यांची कथा व सुंदर झांक्यांद्वारे दर्शन या विषयांवर आधारित असेल. तसेच रविवार, 27 जुलै रोजी भगवान श्रीकृष्ण आणि नरसी मेहता यांची भेट, त्यांच्या परीक्षा आणि भोलेनाथ-गोपिकांसोबतचा महाराससादर केला जाणार आहे. सोमवार, 28 जुलै रोजी भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण व रुक्मिणी यांच्याद्वारे नानी बाईचे मायरा भरणे, कथा विश्राम आणि फुलांची होळी तसेच राधा-कृष्ण झांक्यांचे दर्शन होईल.

हा तीन दिवसीय कार्यक्रम शहरातील पांडुरंग टॉकीज मागील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात होणार आहे, कथेची वेळ दररोज दुपारी 2.30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यत राहणार आहे. कलश यात्रा शनिवार, 26 जुलै रोजी दुपारी दोन वाजता मंदिर प्रांगणातून निघणार आहे. सर्व भक्तांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
