नागपूरसह नाशिक रोड दरम्यान एकेरी विशेष अनारक्षित गाडी धावणार

भुसावळ (17 जुलै 2025) : प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वेने नागपूर आणि नाशिक रोड दरम्यान दोन एकेरी विशेष अनारक्षित रेल्वे गाडीचे संचालन करण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक 01206 एकेरी विशेष अनारक्षित गाडी 23 आणि 24 जुलै 2025 रोजी नागपूर येथून सायंकाळी 19.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 05.30 वाजता नाशिक रोड स्थानकात पोहोचेल.