रोटरी क्लब ऑफ भुसावळचा पदग्रहण समारंभ उत्साहात
संजय चापोरकर अध्यक्षपदी तर रत्नाकर क्षिरसागर सचिवपदी
Rotary Club of Bhusawal’s induction ceremony is a celebration of enthusiasm भुसावळ (17 जुलै 2025) : रोटरी क्लब ऑफ भुसावळचा पदग्रहण समारंभ गुरुवार, 16 रोजी सायंकाळी रोटरी भवनात उत्साहात पार पडला. यावेळी संजय चापोरकर यांची अध्यक्षपदी तर रत्नाकर क्षीरसागर यांची सचिवपदी निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष अनंत पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष संजय चापोरकर तर माजी सचिव आरती चौधरी यांनी रत्नाकर क्षीरसागर यांना सचिव पद सुपूर्द केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून असिस्टंट गव्हर्नर पूनम कोचर, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजीव शर्मा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात समाजोपयोगी उपक्रमाच्या अनुषंगाने गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी पांडूरंग राव, जी.आर.ठाकूर, मदन बोरकर, गोपाल तिवारी, महेश भराडीया, मंगला पाटील, जीवन चौधरी, शीतल भराडिया, सविता शुक्ला, वंदीता पारे, लतिका क्षीरसागर, डॉ.माया आर्वीकर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन चारुलता महाजन यांनी तर आभार मदन बोरकर यांनी मानले.








