यावलमध्ये आरोग्य निरीक्षकांची बदली न झाल्यास स्वातंत्र्य दिनापासून आमरण उपोषण
यावल नगरपालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवेदन

Fast to death from Independence Day if health inspectors are not transferred in Yaval यावल (18 जुलै 2025) : यावल नगरपरिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कामराज घारू यांनी निवेदन देत नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक यांची बदलीची मागणी केली आली आहे. बदली न केल्यास 15ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.
अशी आहे निवेदनातून मागणी
यावल नगर परिषदेमध्ये गुरुवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कामराज घारू यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी देखील आपण निवेदन देत आरोग्य निरीक्षक वीरेंद्र घारू हे स्वच्छता कर्मचार्यांना मानसिक त्रास देत असल्याने त्यांची बदली करण्याची मागणी केली होती मात्र अद्याप पावतो त्यांची बदली केलेली नाही. तातडीने त्यांची बदली केली नाही तर येत्या 15 ऑगस्टपासून नगरपरिषद कारल्यासमोर आपण आमरण उपोषण करू असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.