महिलांच्या डब्यात घुसखोरी : भुसावळात 32 पुरूषांवर कारवाई


भुसावळ (18 जुलै 2025) : रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) महिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यातून प्रवास करणार्‍या पुरुष प्रवाशांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. बुधवार आणि गुरुवारी भुसावळ रेल्वे जंक्शनवर 38 पुरुष प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली.

कारवाईने उडाली खळबळ
रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर.पी.मीना यांनी सांगितले की, महिलांच्या डब्यात महिला प्रवाशांपेक्षा पुरूष प्रवासीच जास्त प्रमाणात बसून प्रवास करतात, यामुळे महिला प्रवाशांना गाडीत बसण्यास जागा मिळत नाही. यामुळे एक्सप्रेस गाड्या भुसावळ जंक्शनवर येताच आरपीएफचे जवान महिलांच्या डब्यांची तपासणी करत आहेत. महिलांच्या डब्यात बसलेले पुरुष प्रवासी आढळल्यास त्यांना तात्काळ ताब्यात घेतले जात आहे. या प्रवाशांविरुद्ध रेल्वे नियमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले जात आहे. न्यायालयात अशा प्रवाशांना दंड ठोठावला जात आहे.


आरपीएफ निरीक्षक पी.आर.मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली जात आहे. महिलांच्या डब्यातून कोणत्याही पुरुषांनी प्रवास करू नये. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी हे डबे आरक्षित ठेवले जातात. या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे आरपीएफने स्पष्ट केले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !