भुसावळ जंक्शनवर सीअ‍ॅण्डडब्लू कर्मचार्‍यांसाठी नवीन कव्हर्ड रोलिंग-इन हटचे उद्घाटन


भुसावळ (18 जुलै 2025) : शहरातील जंक्शनवर इति पाण्डेय यांच्या हस्ते कव्हर्ड रोलिंग-इन हट चे उद्घाटन डीआरएम ईति पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. हे हट भुसावळ स्थानकाच्या नागपूर टोकाला तयार करण्यात आले आहे. येथे आता सीअ‍ॅण्डडब्लू विभागाचे कर्मचारी भुसावळ स्थानकावर येणार्‍या गाड्यांची तपासणी करतील.

पूर्वी या कर्मचार्‍यांना पावसात, उन्हात तसेच प्रवाशांकडून उडवले जाणारे कचरा यांसारख्या अडचणींचा सामना करत काम करावे लागत होते. मात्र या नवीन हटच्या उभारणीनंतर या समस्या प्रभावीपणे सोडवण्यात आल्या आहेत. या नव्याने बांधलेल्या हटमध्ये आधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत ज्यामध्ये बॅकलाइट सह सूचना व मार्गदर्शन करणारी, चित्रफलक, तपासणीदरम्यान निरीक्षणात आणावयाच्या दोषांची यादी, प्रकाश व्यवस्था आणि बसण्याची सुविधा आहे.


या रोलिंग-इन हटच्या बांधकामामागील उद्दिष्ट सी अ‍ॅण्ड डब्लू कर्मचार्‍यांना सुरक्षित व निरोगी कार्य परिसर प्रदान करणे हे असून, यामुळे कर्मचारी अधिक आत्मविश्वासाने आणि परिणामकारकतेने आपले काम करू शकतील आणि रेल्वेच्या गुणवत्तापूर्ण सेवेस अधिक भर देऊ शकतील.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !