यावलच्या ‘कृष्ण तारा’ भागातील समस्या सोडवा : नागरिकांचे निवेदन

Solve the problem in the ‘Krishna Tara’ area of Yaval : Citizens’ statement यावल : (18 जुलै 2025) : यावल नगरपालिकेत शहरातील विस्तारित भागात असलेल्या कृष्ण तारा नगर, गट क्रमांक 756 या भागातील नागरिकांनी निवेदन देत येथील समस्या सोडवण्याची मागणी केली.
अशा आहे समस्या
निवेदनाचा आशय असा की, या भागात गटारी बनवलेल्या नाही. रस्त्याचे काम झालेले नाही. परिणामी सांडपाण्याचा निचरा होत नाही. या भागात कचरा उचलण्यासाठी वाहन येत नाही. या भागात स्वच्छता राबविण्यात यावी व गटारी आणि रस्त्याचे काम केले जावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. गुरुवारी हे निवेदन देण्यात आले.

नगर परिषदेमध्ये अशपाक शाह गफ्फार शाह यांच्यासह कृष्ण तारानगर गट क्रमांक 756 वार्ड क्रमांक तीन मधील नागरिकांनी एकत्रीत येऊन निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कृष्ण तारा नगर वार्ड क्रमांक तीन या विस्तारित भागात अद्याप पावतो विकासकामे झालेली नाही. नगरपालिकेचे सफाई कर्मचारी देखील या भागात येत नाही. या भागात गटारी बांधल्या गेल्या नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले असतात. त्यातून डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी डेंगू आजारामुळे एकाचा या ठिकाणी मृत्यू झाला होता. तेव्हा सध्या पावसाळा सुरू असून या भागात पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन चिखल होतो व शालेय विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी अडचणी निर्माण होतात.
या भागात रस्त्याचे काम आणि गटारीचे काम तत्काळ व्हावे अशी त्यांची मागणी आहे. तसेच या भागात कचरा व साफसफाईसाठी कर्मचारी येत नाही कचरा उचलणारी वाहनेदेखील येत नाही. तातडीने या भागातील समस्या सोडवण्यात याव्या अन्यथा 1 ऑगस्टपासून नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करू, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
या निवेदनावर अशपाक शाहसह पप्पू तडवी, इमरान खान, शेख मझहर, शेख मजीद, धीरज साळुंखे, अजय जोशी, नसीर खान, वामन तायडे सह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत.
