भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात सॅटर्डे इंग्लिश डे

भुसावळ (19 जुलै 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात यी ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत शनिवार, 19 रोजी सकाळी आठ वाजता इंग्लिश विभाग अंतर्गत इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी स्कीट, कर्न्व्हशन, पोईम रिसीक्शन सादर केले. सुमारे 40 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
सूत्रसंचालन इयत्ता नववी ब ची विद्यार्थिनी पूर्वा पाटील, निशा पालवे, राधिका बोरोले आणि खुशबू नेहेते यांनी केले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे तर प्रमुख अतिथी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका संगीता अडकमोल, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, उपशिक्षक एस.पी.पाठक कार्यक्रमास उपस्थित होते.