नंदुरबार गुन्हे शाखेची मोठी कारवाई : शहाद्यात दरोडा टाकणार्‍या आंतरराज्यीय टोळीतील तिघांना अटक


Nandurbar Crime Branch takes major action: Three members of an interstate gang involved in robbery in Shahadya arrested नंदुरबार (20 जुलै 2025) : नंदुरबार गुन्हे शाखेने शहाद्यातील भाग्यश्री ज्वेलर्समध्ये झालेल्या जबरी चोरीची उकल केली आहे. आंतरराज्यीय टोळीतील तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पाच लाख 81 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काय घडले शहाद्यात
शहादा शहरातील तूप बाजारात असलेल्या भाग्यश्री ज्वेलर्समध्ये 12 जुलै रोजी दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवर येत हत्याराचा धाक दाखवत, जिवे ठार मारण्याची धमकी देत दुकानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले होते. याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबीकडून सुरू होता.


गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार शहरातील इमाम बादशाह दर्गा परिसरात दोन-तीन व्यक्ती राशीचे खडे विक्रीच्या बहाण्याने संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळताच त्यांनी पथकाला रवाना केले. इमाम बादशाह दर्गा परिसरात तीघे दुचाकींवर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असता त्यांनी आपले नाव गुलाम हुसेन ऊर्फ गुल्लू मुनव्वर हुसेन (45, देवझिरी कॉलनी, इराणी मोहल्ला, सेंधवा, जि.बडवाणी, मध्यप्रदेश, ह.मु.हुसेन टेकडी, जावरा, जि.रतलाम), यावर हिंमत अली बेग (60, कुर्ची, ता.राईबाग, जि.बिलगाव) व रफिक हुसेन अजीज हुसेन सय्यद (60, रा.अन्सार नगर, जकरिया मंजील, भिवंडी, जि.ठाणे) सांगितले.

आरोपींकडून गुन्ह्याची उकल
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पथकाने यापैकी गुलाम हुसेन याच्याकडील काळ्या रंगाच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात भाग्यश्री ज्वेलर्समधून लुटलेले तीन लाख 61 हजार 570 रुपये किंमतीचे एकूण 38.06 ग्रॅम सोन्याचे दागिने आढळल्याने ते जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास कापूरे, पुरूषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, अभय राजपूत, शोएब शेख, भरत उगले, सतीश घुले आदींच्या पथकाने केली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !