धुळे जिल्ह्यात सर्वात मोठे कोम्बिंग : पिस्टले, काडतूसांसह तलवारींचा साठा जप्त


धुळे (20 जुलै 2025) : धुळे जिल्ह्याला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी सुरूवातीपासून कठोर पावले उचलले आहेत. त्यात गेल्या 24 तासात पोलिस प्रशासनाने जिल्ह्यात कोम्बिंग राबवल्याने गुन्हेगार धास्तावले आहेत. विशेष म्हणजे या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला तर अवैधरित्या चालणार्‍या धंद्यावर कारवाई झाल्यानंतर सर्वसामान्य जनता सुखावली आहे.

अशी झाली कारवाई
पोलिसांनी कारवाईदरम्यान पिस्टलसह चार काडतूस जप्त करीत सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या.


चार तलवारी आणि सर्व आरोपी अटक

हातभट्टी दारूच्या 63 केसेसद्वारे सर्व आरोपी अटक

जुगार- मटकाच्या 40 केसेस करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली

पाच पसार आरोपींना तर एका तडीपाराला अटक करण्यात आली

मोटार वाहन प्रकरणात 300 केसेस करण्यात आल्या

मद्य प्राशन करून वाहन चालणार्‍या सात वाहनांवर कारवाई करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्‍या 14 आरोपी अटक करण्यात आली

या शिवाय पान टपरीवर चार केसेस , 29 वॉरंट बजावणी, 21 हिस्ट्रीशीटर तपासणी, 102 लॉज व ढाबे तपासण्यात आले, 24 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली तर दोन चोरी प्रकरणी उघडकीस आली.

गुन्हेगारीचा बीमोड करणार : पोलिस अधीक्षक
पोलिस हे कायद्याच्या चौकटीत राहून अतिशय मेहनतीने आपले कर्तव्य बजावत आहेत. शहरात शांतता टिकवण्यावर भर असून गुन्हेगारीचा बीमोड सुरूच राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे म्हणाले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !