रुईखेड्यातील एम.एम.नारखेडे विद्यालयात शालेय मंत्री मंडळ निवडणूक


School Council of Ministers election at M.M. Narkhede School in Ruikheda मुक्ताईनगर (21 जुलै 2025) : भविष्यातील नागरिक सुजाण व्हावा, लोकशाही, समता, ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी शालेय पातळीवर एम.एम.नारखेडे विद्यालयामध्ये निवडणुकीसारखी प्रक्रिया प्रत्यक्षपणे राबविण्यात आली. यामध्ये शालेय मंत्री मंडळ निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये 11 उमेदवार उभे होते. बॅलेट युनिटवर मतदान प्रत्यक्षपणे कसे केले जाते त्याचे प्रात्यक्षिक मोबाईलवर अ‍ॅपद्वारे मतदान घेण्यात आले.

400 विद्यार्थ्यांचा सहभाग
मतदान प्रतिनिधी, मतदान अधिकारी जसे निवडणुकीसाठी असतात अगदी त्याचप्रमाणे सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली. निवडणुकीमध्ये स्कूल कमिटीचे चेअरमन चंद्रशेखर बढे, मुख्याध्यापक जे.जे.पाटील, सर्व शिक्षक वृंदांनी मतदान केले. विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर येणार्‍या अडचणी, मुद्यांवर प्रचार केला. शाळेच्या 400 विद्यार्थ्यांनी या मतदानामध्ये मतदान केले त्यातून शालेय मुख्यमंत्री म्हणून दहावीची विद्यार्थिनी पूर्वजा कांता गवळी हिला विद्यार्थ्यांनी भरघोस मतांनी निवडून दिले. तिच्या मंत्रिमंडळामध्ये एकूण 11 सभासद निवडण्यात आले. या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नियोजन मंत्री आरोग्य मंत्री स्वच्छता मंत्री तसेच शालेय मंत्रीमध्ये विज्ञान मंत्रिमंडळ सुद्धा स्थापन करण्यात आले आहे. या मंत्रिमंडळा अंतर्गत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी काम करतील. शाळेत येणार्‍या विविध अडीअडचणी व काही समस्या असतील त्या समस्यांची नोंद घेऊन त्यानुसार हे मंत्री मंडळ विद्यालयात काम करणार आहे. या प्रकारची निवडणूक प्रक्रिया पहिल्यांदाच राबविण्यात आली.




यांनी घेतले परिश्रम
या निवडणुकीची संकल्पना विद्यालयातील शिक्षिका योगीता झांबरे व बबीता तडवी यांनी मांडली. त्यांना मुख्याध्यापक जे.जे.पाटील यांनी संमती दिल्यानंतर कला शिक्षक शशिकांत सोनवणे, क्रीडा शिक्षक एस.एस.कांडेलकर, शिक्षक संदीप चौधरी, कृष्णा भंगाळे, तुषार महाजन, गजानन साखरे, प्रकाश सावकारे, स्वप्नील पाटील यांनी सहकार्य केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !