प्रवाशांना दिलासा : भुसावळ विभागातून धावणार्‍या सहा रेल्वे गाड्यांना मुदतवाढ


Six railway trains running through Bhusawal division extended भुसावळ (21 जुलै 2025) :  रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होत असलेली गर्दी पहाता आणि प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने सहा रेल्वे गाड्या अर्थात तीन जोड्यांच्या साप्ताहिक विशेष गाड्यांच्या फेर्‍यांमध्ये रेल्वे प्रशासनाकडून वाढ केली आहे.यामुळे प्रवाशांना या गाड्यांचा लाभ मिळणार आहे.

या गाड्यांच्या कालावधीत वाढ
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे आणि रेल्वे गाड्यांना होत असलेली गर्दी लक्षात घेता सहा गाड्यांच्या फेरीत वाढ केली आहे, यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. रेल्वेने फेर्‍यामध्ये वाढ केलेल्या गाड्यामध्ये 09025 वलसाड -दानापूर विशेष गाडी आता 29 सप्टेंबरपर्यंत चालवण्यात येईल.




गाडी 09026 दानापूर – वलसाड विशेष गाडी आता 30 सप्टेंबरपर्यंत असेल, गाडी 09031 उधना-जयनगर विशेष गाडी आता 28 सप्टेंबरपर्यंत चालवणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी 09032 जयनगर-उधना विशेष गाडी 29 सप्टेंबरपर्यंत चालवण्यात येईल. गाडी 09045 उधना-पटणा विशेष गाडी 26 सप्टेंबरपर्यत धावणर आहे, तर पटणा-उधना विशेष गाडी आता 27 सप्टेंबरपर्यंत चालवण्यात येणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !