नाशिक रेल्वे मार्गावर ओएचईत बिघाड : सात गाड्यांचे मार्ग बदलले ; 10 रेल्वे गाड्या लेट, दोन गाड्या रद्द,

देवळाली-नाशिक रोड दरम्यान ओव्हरहेड इलेक्ट्रिक बिघाड : रेल्वे वाहतूक विस्कळीत


OHE failure on Nashik railway line: Seven trains diverted; 10 trains late, two trains cancelled, भुसावळ (21 जुलै 2025) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील देवळाली-नाशिक रोड दरम्यानच्या डाऊन लाईनवरील ओव्हरहेड इलेक्ट्रिक (ओएचई) तारेत शनिवारी रात्री 1.30 वाजता बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. या बिघाडामुळे सात रेल्वे गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले तर दोन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या व 10 रेल्वे गाड्या नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने धावल्या.

काम पूर्ण होताच वाहतूक पूर्ववत
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या आहेत. रविवारी सकाळी 10 वाजता डाऊन मार्गावरील ओएचईचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावरून रेल्वे गाड्या सुरू झाल्यात. तब्बल साडेआठ तास डाऊन मार्गावरील वाहतूक बंद होती.




कर्मचार्‍यांमध्ये खळबळ
देवळाली- नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ओएचई वायर नादुरूस्त झाली. यामुळे रेल्वे गाड्या जागेवरच थांबून गेल्या. परिणामी मुंबईकडून भुसावळकडे येणार्‍या रेल्वे गाड्या ईगतपुरी, कसारासह विविध रेल्वे स्थानकांवर रात्री थांबविण्यात आल्या. ओएचई वायरचे काम युध्द पातळीवर करण्यात आले. रेल्वेचे उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळावर आणि रेल्वेच्या डीआरएम कार्यालयातील कंट्रोल रूमला रात्रभर थांबून होते. अचानक झालेल्या या घटनेमुळे रेल्वे अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली.

वळवण्यात आलेल्या गाड्या
ओएचई वायरिंगमुळे रेल्वे गाड्यांवर परिणाम झाल्याने रविवारी मुंबईकडून भुसावळकडे येणार्‍या रेल्वे गाड्या या कल्याण, वसई रोड, सुरत, जळगावमार्गे वळवण्यात आल्या यात 22177 मुंबई – वाराणसी एक्सप्रेस, 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस, 20103 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस, 12859 मुंबई – हावडा गीतांजली एक्सप्रेस, 22129 लोकमान्य टिळक टर्मिनस – अयोध्या कॅण्ट एक्सप्रेस, 04152 लोकमान्य टिळक टर्मिनस -कानपूर विशेष, 12336 लोकमान्य टिळक टर्मिनस-भागलपूर एक्सप्रेस या गाड्यांचा समावेा आहे.

या रेल्वे गाड्या रद्द
ओएचई या बिघाडामुळे दोन महत्त्वाच्या गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या. यात 11113 देवळाली-भुसावळ एक्सप्रेस, 11119 इगतपुरी-भुसावळ मेमू या गाड्या रद्द करण्यात आल्या मात्र या गाड्या सोमवारी नियमीतरित्या धावतील.

वेळेत बदल झालेल्या गाड्या
ओएचई कामामुळे रेल्वे गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे. यामुळे नियोजीत ठीकाणावरून सुटणार्‍या रेल्वे गाड्या विलंबाने धावत आहे. यात लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर काशी एक्सप्रेस 3.50 तास उशिरा लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणार. मुंबई – लखनौ पुष्पक एक्सप्रेस 1 तास उशिरा मुंबई येथून सुटणार. लोकमान्य टिळक टर्मिनस -अगरतला एक्सप्रेस 3.20 तास उशिरा लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटली.मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस 2 तास उशिरा मुंबई येथून सुटली.

उशिराने धावणार्‍या प्रमुख गाड्या
अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे, उशीराने धावणा्र्‍या गाड्यांमध्ये 12322 मुंबई हावडा मेल 9 तास उशिरा, 18029 लोकमान्य टिळक टर्मिनस -शालिमार एक्सप्रेस 8 तास उशिरा, 12167 लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस एक्सप्रेस 10 तास उशिराने, 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटलीपुत्र एक्सप्रेस 10 तास उशिरा,11057 मुंबई – अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस 10 तास उशिरा, 12811 लोकमान्य टिळक टर्मिनस – हटिया एक्सप्रेस 8 तास उशिरा

प्रवाशांसाठी विशेष सुविधा
प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्यात त्यात मे आय हेल्प यू बूथ हे सर्व प्रमुख स्थानकांवर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचारी तैनात केले, तिकीट परतावा काउंटर हे रद्द झालेल्या गाड्यांसाठी किंवा प्रवासात बदल झालेल्या प्रवाशांसाठी विशेष तिकीट परतावा काउंटर उघडण्यात आले.सातत्यपूर्ण घोषणा केल्या जात वळविण्यात आलेल्या गाड्यांची माहिती सर्व संबंधित स्थानकांवर सातत्याने दिली देत आहे, प्रवाशांना प्रवासात अनारक्षित डब्यातील प्रवाशांना चहा, पाण्याची बाटली आणि नाश्ता वितरित करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !