मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात उद्या रक्तदान शिबिर
भुसावळ (21 जुलै 2025) : राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार, 22 रोजी दुपारी एक वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. शहरातील सुरभी नगरातील मंत्री सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात हे शिबिर होणार आहे.




भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी उत्तर विभाग शहराध्यक्ष संदीपभाऊ सुरवाडे व दक्षिण विभाग शहराध्यक्ष किरण कोलते यांनी केले आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर (उत्तर दक्षिण) विभागातर्फे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.