किनगावात भाजपकडून रक्तदान शिबिर

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन


BJP organizes blood donation camp in Kingaon यावल (22 जुलै 2025) : यावल तालुक्यातील किनगाव येथील श्री राम मंदिराच्या सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी सुरू झालेले रक्तदान शिबिर दुपारी दोन वाजेपर्यंत चालले. यात तब्बल 131 दात्यांनी रक्तदान केले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या मंडळ स्तराच्या वतीने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सदर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

यांनी केले आयोजन
किनगावातील श्रीराम मंदिराच्या सभागृहामध्ये मंगळवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन भाजपा मंडळ स्तरावरील भाजपचे सरचिटणीस उज्जैनसिग राजपूत, पुरोजीत चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक विनोद देशमुख, संजय पाटील, भाजपा मंडळाध्यक्ष अनिल पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर मंगळवारी सकाळी दहा वाजता सुरू झाले. यामध्ये 131 रक्त दात्यांनी स्वईच्छने येथे उपस्थित राहुन रक्तदान केले.




यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी राहुल पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य नागेश्वर साळवे, सुभाष पाटील, लतीफ तडवी, मेहमूद शेख, शामकांत महाजन,मयूर पाटील सह आदींनी परिश्रम घेतले या शिबिरात भाजपाच्या विविध पदाधिकारी, मान्यवरांची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !