कंडारी ग्रामपंचायतीने विकासकामे करावी : वंचित बहुजन आघाडीचे निवेदन
Kandari Gram Panchayat should carry out development works : Statement from Vanchit Bahujan Aghadi भुसावळ (23 जुलै 2025) : कंडारी गावातील प्रभाग क्रमांक पाच, नॅशनल हायवे, तक्षशीला नगर, गोलाणी,जगदीश नगर, साखरे फाटा या परिसरात, अनेक वर्षांपासून नाल्या/ गटारी बनवण्यात आल्या नसल्याने लोकांच्या घरातील सांडपाणी हे थेट रस्त्यावर येत आहेत. यामुळे लोकांना पायी चालणेदेखील कठीण झाले आहे तसेच लोकांच्या घरातील सांडपाणी हे दुसर्यांच्या प्लॉटमध्ये जात असल्याने लोकांमध्ये वाद वाढले आहेत. ग्रामपंचायतीने असुविधा लक्षात घेता विकासकामे करावीत, अशी मागणी वंचित आघाडीने निवेदनाद्वारे केली आहे.
अशा आहेत निवेदकांच्या मागण्या
कंडारीत जागोजागी लोकांच्या घरातील सांडपाण्यामुळे घाण पाण्याचे तळे निर्माण झाले आहेत यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच नॅशनल हायवेकडून तक्षशिला नगर प्रवेशद्वारातून कॉलनीमध्ये प्रवेश करताना जो मुख्य रस्ता आहे तो अत्यंत खिळखिळा झाला आहे. तेथून पायी चालणेदेखील कठीण झाले आहे.



गटविकास अधिकार्यांना निवेदन
प्रवेशद्वाराचा रस्ता हा रुंदीला 12 मीटरचा असल्याने तो रस्ता सिमेंट काँक्रीटचा तयार करून द्यावा जेणेकरून शहराच्या सुंदरतेत देखील भर पडेल व तसेच लोकांना देखील याचा फायदा होईल या समस्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडी तर्फे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष निलेश जाधव, तालुका महासचिव गणेश इंगळे, समाधान सुरवाडे, नवनीत गायकवाड, महेंद्र अहिरे, प्रांजल पाटील, प्रकाश बनसोडे, मंगेश टेकाडे, व परिसरातील नागरिक उपस्थित होते.