भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात
Lokmanya Tilak Jayanti celebrated with enthusiasm at De.N.A. Bhole College in Bhusawal भुसावळ (23 जुलै 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या लोकमान्य टिळक जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राचार्य परिषदेचे उपाध्यक्ष, भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. आपल्या अध्यक्षीय संबोधनात प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी टिळकांचे शिक्षण विषयक विचार स्पष्ट करीत असतांना शिक्षण हेच खरे शक्तिशाली शस्त्र आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातूनच राष्ट्र उभे राहू शकते, असे प्रतिपादन केले तसेच सार्वजनिक सणांच्या माध्यमातून समाजात एकता निर्माण करण्यासाठी संघटनाचे महत्व स्पष्ट केले.



यांची होती उपस्थिती
सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.ए.आर.सावळे यांनी केले. आभार प्रा.श्रेया चौधरी यांनी मानले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण यांच्यासह प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.एन.एस.वानखेडे, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.संजय डी.चौधरी, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.खिलचंद धांडे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हजर होते.