भुसावळातील मेहता विद्यामंदिरात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात
भुसावळ (23 जुलै 2025) : शहरातील श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आजाद यांच्या प्रतिमेस प्रधानाध्यापिका यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आजाद यांच्याविषयी माहिती दिली.



शिक्षकांनी लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना विविध माहिती दिली. लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्यातील गुण विद्यार्थ्यांनी जर खर्या अर्थाने स्वीकारले तर विद्यार्थी भविष्यात आदर्श नागरिक बनतीलच म्हणून विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे गुण अंगी स्वीकारले पाहिजे, असे प्रतिपादन प्रधानाध्यापिका रिता शर्मा यांनी केले. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.