25 गुन्ह्यांचा धनी : साक्रीतील अट्टल दुचाकी चोरटे धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलिसांच्या जाळ्यात
दहा चोरीच्या दुचाकी जप्त : चार गुन्ह्यांची उकल : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

Owner of 25 crimes : A persistent two-wheeler thief from Sakri is caught by the West Devpur police in Dhule धुळे (26 जुलै 2025) : धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन अट्टल चोरट्यांना अटक केल असून दहा चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपींच्या अटकेनंतर चार गुन्ह्यांची उकल झाली असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गोल्या उर्फ आदिनाथ युवराज बोरसे (24, दैठणनगर वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे) व भरत सदा अहिरे (34, वस्मार, ता.साक्री) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस यांना दुचाकी चोरट्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला वस्मार गावात रवाना केले व संशयीत गोल्या बोरसे यास अटक केल्यानंतर त्याने सोबत बाळगलेली दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली तसेच साथीदार भरत अहिरे याच्या माध्यमातून दुचाकी चोर्यांची कबुली देत तीन लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 10 दुचाकी काढून दिल्या. आरोपी गोल्याविरोधात राज्यभरात तब्बल 25 गुन्हे दाखल आहेत.
यांनी केली कारवाई
यांनी ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आखाडे, हवालदार मनोज साठे, हवालदार मनोहर पिंपळे, हवालदार दीपक गायकवाड, हवालदार प्रमोद चौधरी, हवालदार पुरूषोत्तम सोनवणे, कॉन्स्टेबल किरणकुमार सावळे, कॉन्स्टेबल अतुल जाधव, कॉन्स्टेबल हेमंत पवार, कॉन्स्टेबल सुनील राठोड, कॉन्स्टेबल सनी सरदार आदींच्या पथकाने केली.