नागरिकांच्या अडचणींवर वेळेत काढावा तोडगा : आढावा बैठकीत आमदार अमोल जावळे
Citizens’ problems should be solved in time: MLA Amol Javale in review meeting रावेर (26 जुलै 2025) : सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून गतिमान कार्यपद्धती स्वीकारावी तसेच नागरिकांच्या अडचणींवर वेळेत तोडगा काढावा, असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल जावळे यांनी दिले.
रावेर मतदारसंघातील विविध शासकीय विभागांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आमदार जावळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली.
या बैठकीत महसूल, महावितरण, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, नगरपरिषद, ग्रामविकास व इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



महसूल विभाग
संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना, शेती मोजणी व रेशन दुकान या योजनांची माहिती सादर झाली. लाभार्थ्यांना अधिक चांगली सेवा मिळावी यासाठी कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नगरपरिषद विभाग
स्वच्छता मोहिम, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्त्यांची स्थिती, व बचत गट प्रभाग संघ कार्यालयाची कामगिरी यावर सखोल चर्चा करण्यात आली.
महावितरण विभाग
शेतकर्यांच्या वीजविषयक अडचणी, सबस्टेशन उभारणी, सौरऊर्जा प्रकल्प आदी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
पोलीस विभाग
कायदा सुव्यवस्था, अवैध गोतस्करीसारखे गंभीर मुद्दे, स्थानिक गुन्हेगारीवरील नियंत्रण यावर सविस्तर चर्चा झाली.
आदिवासी विकास विभाग
चारमाळी येथील आदिवासी वस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जाणार्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यासाठी प्रांताधिकारी आणि आदिवासी प्रकल्प अधिकार्यांशी स्वतंत्रपणे चर्चा झाली.
सार्वजनिक बांधकाम विभाग
प्रमुख रस्त्यांची सद्यस्थिती, रखडलेली कामे, व तांत्रिक अडचणी यावर विचारमंथन झाले. प्रलंबित कामांची गती वाढवण्याचे निर्देश दिले.
यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला प्रांताधिकारी बबन काकडे, यावल तहसीलदार मोहनमाला नाजीरकर, रावेर तहसीलदार बंडू कापसे, आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार, फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे, सावदा अभियंता गणेश महाजन, यावल गटविकास अधिकारी मंजुषा गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जहांगीर तडवी, जिल्हा परिषद अभियंता रवींद्र इंगळे, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे, रावेरचे पोलीस निरीक्षक विशाल जैस्वाल, फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, रावेर पोलीस निरीक्षक विशाल पाटील, निंभोर्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी आमदार जावळे यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडवावेत, असा स्पष्ट संदेश दिला. कार्यक्षम प्रशासनाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.




