भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात लाईफ टाइम अचिवमेंट कार्यक्रम
भुसावळ (29 जुलै 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात एपीजे अब्दुल कलाम यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी लाईफटाइम अचिवमेंट कार्यक्रम घेण्यात आला. खुशबू तडवीने एपीजे अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती दिली. उत्कर्ष सपकाळे याने एपीजे अब्दुल कलाम यांचे मूलमंत्र सांगितले.
इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनगाथेचे सादरीकरण केले. वरद पाटीलने पोखरण येथे झालेल्या अणुचाचणी विषयी व भाग्यश्री जगतापने डॉ.कलाम यांच्या पक्षी निरीक्षणाची व आपत्ती व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे यांच्या संकल्पनेतून झाली.

सूत्रसंचालन भूमिका जोशी व पूर्वी बोरनारे यांनी केले. पौरवी, महेक, भूमिका, उत्कर्ष, संस्कार, ज्ञानेश, समीक्षा व श्रद्धा यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्या शाळेतील एका प्रसंगाची नाटिका सादर केली. या कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे यांची उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी जिद्द, चिकाटी व जिज्ञासा व सतत प्रयत्न याविषयी मार्गदर्शन केले.
वैशाली महाजन, नम्रता जावळे, विशाल राणे व सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, एस.पी.पाठक, एम.व्ही.गरुडे, प्रयोगशाळा असिस्टंट पंकज गाजरे, केतन जावळे, माधव बाविस्कर व आसीफ तडवी यांचे सहकार्य लाभले.




