अजीज शेख धुळ्याचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी : राज्यात पुन्हा आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या


Aziz Sheikh Dhule’s Chief Executive Officer: IAS officers transferred again in the state मुंबई (30 जुलै 2025) : राज्यात पुन्हा आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महायुती सरकारकडून प्रशासकीय विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांचा धडाका सुरू ठेवला आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राज्यातील अधिकार्‍यांच्या बदल्याचं सत्र सुरुच आहे.

या अधिकार्‍यांची झाली बदली




1) अजीज शेख, व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मुंबई यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची धुळे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

2) अशीमा मित्तल या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक इथं कार्यरत होत्या. त्यांची नाशिकहून जालना जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

3) श्रीकृष्णनाथ पांचाळ जिल्हाधिकारी जालना यांची ठाणे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

4) विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव मंत्रालय, मुंबई येथून अपर मुख्य सचिव महसूल मंत्रालय, मुंबई या पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे.

5) अनिल डिग्गीकर अपर मुख्य सचिव दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई येथून अपर मुख्य सचिव अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय, मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.

अशीमा मित्तल यांच्यावर मोठी जबाबदारी
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे उद्या निवृत्त होणार
ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे उद्या निवृत्त होत आहे. त्यांच्या जागी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकृष्णनाथ पांचाळ या आधी जालन्याचे जिल्हाधिकारी होते.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !