काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी अॅड.प्रवीण सुरवाडेंची वर्णी
Adv. Praveen Surwade appointed as Congress’s regional general secretary भुसावळ (3 ऑगस्ट 2025) : भुसावळ शहरातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते अॅड.प्रवीण सुरवाडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसचे मोठे पद भुसावळ शहराला मिळाले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमेटी दिल्ली येथून राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार के. सी. वेणू यांनी ही नियुक्ती केली. याबाबतचे पत्र सुरवाडे यांना प्राप्त झाले आहे. या नियुक्तीबद्दल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. आगामी काळात जिल्ह्याभरात पक्षाचे संघटन वाढवून तरुणांना पक्षाच्या विचारधारेत सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न असतील, असे अॅड.प्रवीण सुरवाडे यांनी सांगितले.

उच्च शिक्षीत तरुणाला संधी
अॅड.प्रवीण हे उच्चशिक्षित तरुण असून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. गतवर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेत भुसावळ विधानसभा अनुसूचित जाती या राखीव मतदारसंघात महाविकास आघाडीतून काँग्रेसला जागा सोडण्यात आली होती त्या जागेचे प्रमुख दावेदारअॅड.प्रवीण सुरवाडे हे होते परंतु डॉ.राजेश मानवतकर यांना उमेदवारी जाहीर झालयानंतर त्यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार केला व निवडून येण्यासाठी संघटनात्मक काम केले.
काँग्रेस पक्षाने त्यांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सरचिटणीस हे महत्त्वाच्या पदावर त्यांची निवड केली. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे तसेच त्यांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्य या संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष आहेत.




