शिष्यवृत्ती परीक्षा : एन.के.नारखेडे विद्यालयाचे आठ विद्यार्थी मेरीटमध्ये


Scholarship exam: Eight students of N.K. Narkhede School in merit भुसावळ (3 जुलै 2025) “ भुसावळातील एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या पाचवी व आठवच्या विद्यार्थ्यांनी राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे आयोजित पुर्व उच्च प्राथमिक व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश म्ळिवले. या परीक्षेत शाळेतील एकूण आठ विद्यार्थी मेरीट यादीत तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय निवड होवुन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.

या विद्यार्थ्यांनी मिळवले यश
पाचवीच्या वर्गातील चैतन्य किरण पाटील आणि अनुष्का दिनेश वाणी यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय मेरीट यादीत स्थान पटकावले.


आठवीच्या वर्गातील निशांत दिनेश वाणी, दुर्वेश पराग चौधरी, चेतन लिलाधर चौधरी, कशिश संतोष तेली, घृष्मा राजेंद्र चौधरी, श्रेया प्रशांत ब-हाटे या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय मेरीट यादी मध्ये निवड होवुन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.

गुणवंतांवर कौतुकाचा वर्षाव
विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे, उपाध्यक्ष डॉ.किशोर एन.नारखेडे, चेअरमन श्रीनिवास एन.नारखेडे, सेंक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्थेतील सर्व सभासदांतर्फे, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे यांनी कौतुक केले. या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षक व पालक यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !