भुसावळात भाजपाची शहर कार्यकारणी घोषित : नवीन चेहर्‍यांना संधी

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप


Appointment letter distributed by Textile Minister Sanjay Savkare भुसावळ (3 जुलै 2025) : भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व कार्यक्रमांतर्गत भुसावळातील स्टार लॉनमध्ये महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वात भाजपा शहर कार्यकारिणी घोषित झाल्यानंतर पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भुसावळ भाजपा उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे यांनी शहर कार्यकारणीची तसेच विविध आघाडी मोर्चांच्या अध्यक्षांची नावे जाहीर केली.

नूतन कार्यकारणीत दोन सरचिटणीस, सात उपाध्यक्ष, सात सचिव व एक कोषाध्यक्ष अशी एकूण 18 जणांचा समावेश करण्यात आला असुन या नवनियुक्त पदाधिकार्‍यांना महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


या शहर कार्यकारणीत सामाजिक गणितांचा विचार करून समतोल राखण्याचा प्रयत्न करण्या सोबतच महिलांनाही संधी देण्यात आली.

अशी आहे कार्यकारणी

शहराध्यक्ष- संदीप पंडितराव सुरवाडे

सरचिटणीस- पवन बुंदेले, सागर चौधरी

उपाध्यक्ष- प्रीतमा गिरीश महाजन, वैशाली ललित मराठे, विशाल जंगले, मीना लोणारी, श्रेयस इंगळे, अ‍ॅड.अभिजीत मेने, नितीन नाटकर

सचिव- प्रीती मुकेश पाटील, सुजित हेमराज भोळे, चेतन जैन, किरण सरोदे, रवींद्र खरात, प्रा सीमा धीरज पाटील, लखन रणधीर

कोषाध्यक्ष- सागर साळी

महिला मोर्चा अध्यक्षा -वैशाली सैतवाल

युवा मोर्चा अध्यक्ष -संकल्प वाणी

अनुसूचित जाती अध्यक्ष -संतोष ठोकळ

व्यापारी आघाडी अध्यक्ष – रिषभसिंह राजपूत

ज्येष्ठ कार्यकर्ता अध्यक्ष- शंकर शेळके

अल्पसंख्यांक अध्यक्ष -रेहमान शेख बाबू

शिक्षक आघाडी अध्यक्ष -तुषार चिंधळे

प्रसिद्धी प्रमुख- गोकुळ बाविस्कर







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !