भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी
भुसावळ (3 ऑगस्ट 2025) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये नसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, ऑनररी जॉईट सेंक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्थेचे सभासद विकास पाचपांडे, मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे यांच्याहस्ते डॉ.केतन महाजन, डॉ.मनिषा इंगळे, डॉ.दीपाली फिरके, डॉ.कैलास ठाकरे, डॉ.कल्पेश इंगळे, डॉ.शमशेद गवळी, डॉ.शुभम येवले जनरल फिजीशियन तसेच दंतरोग तज्ज्ञ डॉ.योगेश चौधरी, बालरोग तंज्ञ डॉ.प्रहिज फालक, नेत्ररोग तज्ञ डॉ. आरती चौधरी या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

तज्ज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची तपासणी, दातांची व डोळ्यांची तपासणी केली. विद्यार्थ्यांचे आरोग्य विषयक समस्यांचे निवारण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मेडीकल चेकअपचे सर्व नियोजन सुषमा चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका गजाला बासीत यांनी केले.




