बागवान प्रीमियर लीग सीजन -2 फैजान सीसीने पटकाविला


Faizan CC won the Baghwan Premier League Season-2! भुसावळ (4 ऑगस्ट 2025) : बागवान जमात सातारा व बागवान युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हाजी जाकीर बागवान यांनी टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने आयोजित साकेगाव महामार्गावरील टर्फ येथे डे -नाईट टेनिस बॉल क्रिकेट अंतिम सामना फैजान सीसीने अबूबकर सीसी संघावर 14 धावांनी मात करत पटकावला.

स्पर्धेत बागवान जमातच्या बारा संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे आयोजन युट्युब वर लाईव्ह करण्यात आले होते. साखळी पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत अंतिम सामना फैजांन सीसी व अबूबकर सीसी यांच्यात झाला हा सामना ‘फैजान’ सीसीने 14 धावांनी जिंकत बागवान प्रीमियर लीग सीजन -2 वर आपले नाव कोरले.


अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच- उमेर बागवान, बेस्ट बॅट्समन- सुफियान बागवान, मॅन ऑफ द सिरीज- बबलू बागवान, बेस्ट बॉलर साकीब बागवान बागवान यांना देण्यात आले. स्पर्धेत अंतिम सामनारा जिंकणार्‍या फैजान सीसी संघाला 11 हजार व चषक सईद हाजी बशीर बागवान यांच्या हस्ते देण्यात आले तर उपविजेता अबूबकर संघाला 5 हजार रोख मुश्ताक हाजी मुसा बागवान यांच्याहस्ते देण्यात आले. स्पर्धेचे आयोजन हाजी जाकिर बागवान, साजीद बागवान, नदीम बागवान यांनी केले होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !