भुसावळात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर
Chhatrapati Shivaji Maharaj Samadhan Camp in Bhusawal in the presence of Textile Minister Sanjay Savkare भुसावळ (4 ऑगस्ट 2024) : महसूल सप्ताह 2024 निमित्त भुसावळ महसूल मंडळ अंतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासन निर्णयातील तरतुदीनुसार, नागरिकांना विविध शासकीय सेवा एका छताखाली देण्याच्या उद्देशाने अनेक विभागांचे स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आले होते. या शिबिरामध्ये लाभार्थ्यांना लाभ मंजुरीचे प्रमाणपत्र आणि दाखले मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या समस्या, अडचणी ऐकून घेण्यात आल्या आणि त्याचे तात्काळ निराकरण करण्यात आले. मंत्री महोदयांनी 7/12 संगणकीकरणाच्या प्रक्रियेत मागील काळात झालेल्या त्रुटी लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.
यांची शिबिराला उपस्थिती
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, शहरचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, नायब तहसीलदार शोभा घुले, प्रीती लुटे, जितेंद्र पाडवी, मंडळ अधिकारी प्रफुल्ल कांबळे, तलाठी मंगेश पारिसे, तेजस पाटील, बाळासाहेब गायकवाड, सोनाली कोळी, कोतवाल रवींद्र धांडे, जितेश चौधरी, सुपडू मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी व सामान्य नागरिक उपस्थित होते.




