भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात राखी प्रदर्शन


Rakhi display at K. Narkhede School in Bhusawal भुसावळ (4 ऑगस्ट 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात आगामी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून राखी बनवण्यावर कार्यशाळा झाली तर राखीव प्रदर्शनी व विक्री उपक्रम तसेच ‘एक राखी देश के रक्षक के नाम’, सैनिकांना राख्या पाठवण्याचा उपक्रम गाईड युनिटतर्फे राबवण्यात आला.

इयत्ता नववी दहावीच्या गाईड्सने स्वतःच्या हाताने राख्या बनवणे शिकून तयार केल्या व शनिवार, 2 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता राखी प्रदर्शन व विक्री करिता स्टॉल लावले. राखी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, उपमुख्याध्यापिका एस.ए.अडकमोल, ज्येष्ठ शिक्षक एस.पी.पाठक यांच्याहस्ते झाला. या उपक्रमात 42 गाईडने सहभाग नोंदवला. आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी खरी कमाई अंतर्गत उपक्रम अतिशय कौशल्याने पूर्ण केला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !