अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले : भारतावर 24 तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’?


न्यूयॉर्क (5 ऑगस्ट 2025) : भारतावरील टॅरिफमध्ये आगामी चोवीस तासांत प्रचंड मोठी वाढ करण्यात येईल, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पुन्हा एकदा दिली. त्यांनी सांगितले की, ‘भारत चांगला व्यापार भागीदार नाही आणि हा देश अजूनही रशियाकडून तेल खरेदी करत आहे त्यामुळे टॅरिफमध्ये वाढ करण्यात येईल.’ भारतावरील टॅरिफमध्ये प्रचंड मोठी वाढ करण्याच्या धमकीवरच ट्रम्प थांबले नाहीत, तर भारताकडून मोठा दंडही वसूल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सीएनबीसी स्क्वॉक बॉक्सला दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले की, भारत हा सर्वाधिक कर आकारणारा देश आहे. इतर कुठल्याही देशापेक्षा जास्त कर भारत आकारतो. त्यामुळे आम्ही भारताशी फारच थोडा व्यापार करतो. ट्रम्प यांनी म्हटले की, ‘भारत चांगला व्यापारी भागीदार नाही. भारत आमच्याशी भरपूर व्यापार करतो, पण आम्ही भारताशी फारसा व्यापार करीत नाही. त्यामुळे आम्ही आधीच 25 टक्के टॅरिफ भारतावर लावले आहे. पण मला वाटते की, पुढील 24 तासांत भारतावरील टॅरिफमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात वाढ करायला हवी. कारण भारत अजूनही रशियन तेल खरेदी करत आहे. तो युद्ध यंत्रणा चालवण्यासाठी इंधन पुरवत आहे. भारत जर हा प्रकार सुरूच ठेवणार असेल, तर मला आनंद होणार नाही.’




भारतासोबतचा करार व्यापार जवळपास पूर्णत्वास आलेला होता, त्याचे काय झाले, या प्रश्नावर ट्रम्प यांनी म्हटले की, ‘भारतासोबत मुख्य अडचण हीच आहे की, त्यांचे टॅरिफ खूपच जास्त आहेत. मी आता सांगू इच्छितो की, भारत सर्वाधिक कर आकारेल आणि आम्हाला मात्र शून्य कर देईल… हे चांगले नाही.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !