श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानात श्रीमद् भागवत ज्ञान यज्ञात पौराणिक कथांचा भावस्पर्शी प्रवाह


भुसावळ (7 ऑगस्ट 2025) : शहरातील पांडुरंग टॉकीज मागील श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानात सुरू असलेल्या श्रीमद् भागवत ज्ञान यज्ञाच्या कथेत पंडित जगदीश शर्मा यांनी पौराणिक कथांचा भावस्पर्शी उलगडा करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी वामन अवताराची कथा सांगून भाविकांना मंत्रमुग्ध केले.

वामन अवतारातून भगवंतांची लीला स्पष्ट
श्रीमद भागवत कथेत निरूपण करतांना पंडीत जगदीश शर्मा शास्थिी यांनी अनुसया पतीव्रत धर्माची परीक्षा ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी घेतलेली कथा सांगत,स्त्रीच्या पतिव्रत धर्माचे महत्व स्पष्ट केले.गजेंद्र मोक्ष कथेतून संकटात असताना भगवंताची मनापासून स्तुती केल्यास भगवंत स्वतः मदतीस कसे धावून येतात,याचे प्रेरणादायी उदाहरण मांडले. तसेच समुद्रमंथन प्रसंगात देव-दानवांनी केलेल्या मंथनातून 14 रत्न बाहेर पडल्याचे वर्णन केले. यामधील अमृत देवांना देण्यासाठी भगवंताने मोहिनीचे रूप धारण केले, ही घटना श्रोत्यांसमोर जिवंत केली.वामन अवतार कथेतून राजा बळीची परीक्षा घेताना भगवंताची लीला स्पष्ट केली.


निरूपणा दरम्यान श्रीमद् भागवत हा साक्षात भगवंताचा अवतार असल्याचे सांगून नृसिंह अवतार आणि प्रल्हाद चरित्रातील भक्ती, श्रद्धा आणि धैर्य यांचा गौरव केला.

संपूर्ण प्रवचनात पंडित शर्मा यांच्या रसाळ कथनशैलीतून गीतेतील गूढ तत्त्वज्ञान, भक्तिभाव आणि आदर्श जीवनमूल्ये श्रोत्यांपर्यंत पोहोचली.उपस्थित भाविकांनी या आध्यात्मिक प्रवाहाचा लाभ घेतला. यावेळी मंदिर भाविकांनी भरलेले होते. भाविकांनी श्रीमद भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री राधाकृष्ण प्रभात फेरीचे राधेश्याम लाहोटी यांनी केले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !