भुसावळातील गजानन ठाकूर यांना उत्कृष्ट असिस्टंट गव्हर्नर 3030 चा पुरस्कार


Gajanan Thakur from Bhusawal awarded as Best Assistant Governor 3030 भुसावळ (7 ऑगस्ट 2025) : भुसावळातील रेल्वेचे सेवानिवृत्त राज शिष्टाचार अधिकारी व रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष गजानन ठाकूर यांना अकोला येथे रविवार, 3 रोजी आयपीडीजी रोटरियन राजेंद्रसिंग खुराणा यांच्याहस्ते 2024-25 साठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ट असिस्टंट गव्हर्नर 3030 चा पुरस्कार देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेंद्र भामरे, डिस्ट्रीक गव्हर्नर ज्ञानेश्वर गव्हाळे, पीडीजी राजीव शर्मा, डॉ.रश्मी शर्मा, आशा वेणूगोपाल, राजेसंग्रामसिंग भोसले, पीडीजी किशोर केडीया, शब्बीर शाकीर, महेश मोकाळकर व डिजीई डॉ.राजेश पाटील, आनंद पाटील, रोटरी क्लब अध्यक्ष संजय चापोरकर, सचिव रत्नाकर क्षीरसागर, मदन बोरकर, गजानन सेवलकर, अशोक निकम, प्रा.दयाधन राणे उपस्थित होते. यापूर्वीही गजानन ठाकूर यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अनेक पुरस्कारांनी रोटरीने गौरवले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !