देवेंद्रजी तुमच्यापेक्षा आम्हाला ज्योतीष जास्त समजते ; भाजप सरकारच सत्तेवर येणार


भुसावळच्या सभेत माजी मंत्री एकनाथराव खडसे ; जिल्ह्यातील सर्व जागांवर भाजपाचे आमदार निवडून येणार

भुसावळ : खडसे व मुख्यमंत्र्यांमधील सख्य राज्याला ठावूक असल्याने खडसे शुक्रवारच्या सभेत काय बोलणार ? याकडे राजकीय धुरीणांच्या नजरा खिळल्या असताना खडसेंनी भाषणात अखेर देवेंद्रजी तुमच्यापेक्षा आम्हाला ज्योतीष जास्त समजते आता भाजप सरकारच निवडून येणार असल्याची कोपरखळी मारत जिल्ह्यातील सर्व जागांवर भाजपाचे आमदार विजयी होतील, असा विश्‍वासही व्यक्त केला. खडसे सरकारवर टिका करतील ? अशी शक्यता असलीतरी खडसेंनी मात्र सरकारच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले तसेच मुख्यमंत्र्यांच्या कामाचे जनतेसमोर कौतुकही केले. विरोधकांना ईव्हीएमवर टिका करू द्या, यात्रेचे स्वागत म्हणजे जनतेचा कौल आपल्यासोबत असल्याचेही खडसे म्हणाले.

मुख्यमंत्री साहेब मोठे उद्योग पळवू नका
माजी मंत्री एकनाथराव खडसे सारंगखेडा-सुरवाडे, शेळगाव बॅरेज तसेच मेगा रीजार्च प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्याची गरज असल्याचे सांगत भुसावळसह जळगाव एमआयडीसी मोठे उद्योगधंदे येण्याची अपेक्षा व्यक्त केली मात्र मुख्यमंत्री मोठे प्रकल्प नागपूरात पळवतात अन्यथा मामाच्या गावाला अमरावतीला नेतात, अशी त्यांनी कोपरखळी मारतात हास्याचे फवारे उडाले. हतनूर धरणातील गाळ काढण्यासह आठ दरवाजांचे बंद असलेले काम सुरू करावे तसेच दीपनगर प्रकल्पात जमिनी गेल्याने 80 टक्के बेरोजगारांच्या हातांना काम मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.


कॉपी करू नका.