कोईम्बतूर-जयपूरदरम्यान विशेष गाड्यांच्या 10 फेर्‍या

भुसावळ विभागातील प्रवाशांचा लाभ


भुसावळ (7 ऑगस्ट 2025) : रेल्वे प्रशासनाने कोईम्बतूर-जयपूर – कोईम्बतूर दरम्यान अतिरिक्त प्रवासी गर्दीचा ताण कमी करण्यासाठी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या एकूण 10 फेर्‍या धावणार असून, या गाडीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही गाडी महाराष्ट्रातील भुसावळ, जळगाव, अकोला, नंदुरबार आदी स्थानकांवर थांबणार असल्याने उत्तर भारतात जाणार्‍या प्रवाशांना सोयीचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

गाडी 06181 कोईम्बतूर-जयपूर विशेष गाडी 7 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक गुरुवारी कोईम्बतूर येथून सकाळी 2.30 वाजता सुटेल आणि शनिवारी दुपारी 1.25 वाजता जयपूर येथे पोहोचेल. तर गाडी 06182 जयपूर -कोयंबतूर विशेष गाडी 10 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान प्रत्येक रविवारी रात्री 10.5 वाजता जयपूर येथून सुटेल आणि बुधवारी सकाळी 8.30 वाजता कोईम्बतूरला पोहोचेल.


ही गाडी त्रिपुर, इरोड, सालेम, जोलारपेट्टी, काटपाडी, रेणुगुंटा, कडापा, येरगुंतला, गुटी, ढोणे, करनूल सिटी, गडवाल, मेहबूब नगर, काचीगुडा, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, मुदखेड, हजूर साहिब नांदेड, पूर्णा, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, भरूच, वडोदरा, गोद्रा, रतलाम, जावरा, मंदसौर, निमच, चित्तौडगड, चंदेरिया, भिलवाडा, बजरंगनगर, नासिराबाद, अजमेर आणि किशनगढ येथे थांबणार आहे.

या विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे मिळून एकूण 18 डब्बे असतील, रेल्वेच्या या उपक्रमामुळे प्रवाशांना विशेषतः गणपती उत्सव आणि प्रवासाच्या हंगामी कालावधीत मोठी सुविधा मिळणार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !