रेल्वे प्रवाशांसाठी रेल मदत अॅप : एकत्रीत हेल्पलाईन 139 सुरक्षा व सोयीसाठी अहोरात्र सेवा
भुसावळ (7 ऑगस्ट 2025) : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, सोयीसाठी आणि समाधानकारक प्रवास अनुभवासाठी एकत्रित हेल्पलाइन 139 व ‘रेल मदत’ मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे. देशभरातील प्रवाशांना याचा 24 तास लाभ घेता येणार आहे. यामुळे प्रवााांना या अॅपद्वारे मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वेमध्ये पूर्वी वेगवेगळ्या सेवांसाठी स्वतंत्र क्रमांक वापरण्याची गरज होती. आता मात्र सुरक्षा, तक्रार, चौकशी, हरवलेले सामान, स्वच्छता, खाद्यपदार्थ, महिला प्रवासी सुरक्षा, वैद्यकीय मदत आदी सर्वांसाठी एकच क्रमांक 139 सुरू करण्यात आला आहे. हा क्रमांक कॉल, एसएमएस व इंटरअॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टमद्वारे कार्यरत असून देशातील कुठल्याही भागातून प्रवाशांना संपर्क साधता येणार आहे.

भारतीय रेल्वेने विकसीत केलेले ‘रेल मदत अॅप हे वापरकर्ता अनुकूल मोबाईल अॅप आहे. यामध्ये सुरक्षा सहाय्य, तक्रार नोंदणी व निराकरण, ट्रेनची लाईव्ह स्थिती, पीएनआर स्टेटस, प्लॅटफॉर्म क्रमांक,स्टेशन सुविधा, परतावा माहिती अशा अनेक सेवा आहेत. प्रवासी आपल्या तक्रारींची प्रगती पाहू शकतात तसेच सेवाबाबत फीडबॅक देऊ शकतात. हे प मोफत उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांना विनंती केली आहे की, या सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि आपला प्रवास सुरक्षित व सोयीचा करावा. रेल मदत अॅप व हेल्पलाईन 139 या सेवा रेल्वेच्या डिजिटायझेशन व प्रवासी-केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतिक असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.




