वयोश्री योजनेचा लाभ मिळावा ; जेष्ठ नागरिकांची मागणी


मुक्ताईनगर (7 ऑगस्ट 2025) : शहरातील अनेक जेष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार जेष्ठ नागरिकांनी केली आहे. योजनेस पात्र असताना तसेच वयोश्री योजनेच्या लाभार्थींच्या यादीत नाव समाविष्ट असतानाही लाभ मिळत नसल्याची लेखी तक्रार जेष्ठ नागरिकांनी तहसीलदार, मुख्याधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी यांच्या कडे केली आहे

अनेक दिवसांपासून नगरपंचायतीच्या चकरा मारूनही नगरपंचायतीतर्फे कोणतीही दाद पुकार घेतली जात नाही. योजनेचा तत्काळ लाभ मिळावा, अशी मागणी जेष्ठ नागरिक रामचंद्र सावळे, अशोक धुंदले, सारंगधर मांडोकार,पंडित बोदडे, जनार्दन बोदडे,बळीराम इंगळे,रामलाल जाधव, भास्कर कोळी, शेख मुसा करिम, शेख रशीद गुलाब व अजीज शेख यांनी केली आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !