भुसावळ विभागातील दोन कर्मचार्‍यांचा महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्काराने गौरव


Two employees of Bhusawal division honored with General Manager Safety Award भुसावळ (7 ऑगस्ट 2025) : रेल्वेच्या कार्यप्रणालीत सुरक्षितता हे अत्यंत महत्त्वाचे दायित्व मानून, कर्तव्य बजावत असताना अतिशय सतर्कता आणि प्रसंगावधान दाखवणार्‍या दोन कर्मचार्यांना भुसावळ विभागातून‘महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार (सेफ्टी अवॉर्ड) देऊन मुंबईत सन्मानित करण्यात आले.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांच्याहस्ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झालेल्या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. यामध्ये संपूर्ण मध्य रेल्वेमधून 13 कर्मचार्यांची निवड करण्यात आली असून, त्यापैकी 2 कर्मचारी भुसावळ विभागातील आहेत. दोन्ही कर्मचार्‍यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामामुळे त्यांचा मुंबईत गौरव करण्यात आला. मध्य रेल्वेतून 13 जणांचा समावेश होता, त्यात भुसावळ विभागातील 2 जणांचा समावेश आहे. यात लोको पायलट प्रदीप बारडे (भुसावळ) 11 जून रोजी पुणे-अमरावती एक्स्प्रेस चालवताना ड्युटीवर असताना त्यांनी वादळामुळे रुळांवर कोसळलेले झाड पाहिले. त्यांनी तत्काळ आपत्कालीन ब्रेक लावून गाडी थांबवली आणि प्रवाशांच्या मदतीने झाड हटवले. सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना पार पाडून गाडी पुढे नेण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अपघात टळला. यामुळे त्यांना सन्मानीत केले.


तसेच बडनेरा येथील ट्रॅक मेंटेनर मंगेश रामटेके यांनी 2 जुलै 2025 रोजी ड्युटीवर असताना त्यांनी कि.मी. 662/11-12 दरम्यान रेल्वे ट्रॅकमध्ये तडे पडलेले असल्याचे दिसले, त्यांनी तत्काळ ट्रॅक सुरक्षित करून वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली. त्यांच्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य दुर्घटना टळली. या दोन्ही कर्मचार्यांना प्रशस्तीपत्र, पदक, प्रमाणपत्र आणि 2 हजार रूपये रोख बक्षीस देण्यात आले. त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल महाव्यवस्थापक मीना यांनी विशेष गौरवोद्गार काढले.

रेल्वे प्रवासाची सुरक्षितता सुनिश्चित करणार्‍या अशा कर्मचार्‍यांमुळेच रेल्वे व्यवस्थेवरील प्रवाशांचा विश्वास अधिक बळकट होतो, असे गौरवोद्गार या प्रसंगी वरिष्ठ अधिकार्‍यांनी काढले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !