समाजाचे परिवर्तन करणे ही मोठी जबाबदारी पेलतांना मूल्यनिष्ठ पत्रकारितेची गरज : ब्र.कु.शांतनुभाई
Changing the society is a big responsibility, the need for valuable journalism: Br. Ku. Shantanubhai भुसावळ (7 ऑगस्ट 2025) : समाजाचे परिवर्तन करणे ही मोठी जबाबदारी पेलतांना मूल्यनिष्ठ पत्रकारितेची गरज असल्याचे विचार प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू येथील राजस्थान मीडिया विभागाचे राष्ट्रीय समन्वयक ब्र. कु. शांतनु भाई यांनी येथे व्यक्ि केले. भुसावळ येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात आयोजित पत्रकारांच्या स्नेह मिलन कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
समाजात मोठ्या प्रमाणावर नकारात्मक भाव
शांतनु भाई म्हणाले की, आज समाजात खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक भाव पसरविला जात आहे. चिंतात्मक परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे. एकीकडे हिंसाचार वाढत आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही बाबी सगळीकडे लगेच पसरवल्या जातात त्याचे परिणाम आपण सर्वजण जाणत आहात यासाठी आपल्या पत्रकार बांधवावर खूप मोठी जबाबदारी आहे. समाजाला सकारात्मकतेचा विचार करणार्या मांडणे हे आपल्या पत्रकाराची जबाबदारी आहे आणि ती आपण करत आहात, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर माउंट आबू येथे होणार्या नॅशनल मीडिया कॉन्फरन्सला येण्याचे आवाहन त्यांनी पत्रकार बंधूंना केले .

यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून सर्व पत्रकार बंधूंचे व अतिथींचे स्वागत सेवा केंद्रसतर्फे करण्यात आले. त्यानंतर सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने बी.के.शांतनू भाई यांचा सत्कार वृक्षाचे रोप, शाल व फेटा चढवून करण्यात आला. त्यानंतर सेवा केंद्राच्या प्रमुख संचालिका बीके सिंधू दीदी यांचाही सत्कार पत्रकार बंधूनी केला.
बीके सिंधू दीदी यांनी सर्व पत्रकार बंधूंना मार्गदर्शन केले व परिवारासह माउंट आबू इथे होणार्या संमेलनासाठी जाण्याचे आवाहन केले. नाना पाटील सर यांनी समन्वयक म्हणून कार्य करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पत्रकार बंधू-भगिनींना सेवा केंद्राच्या वतीने रक्षाबंधन साजरी करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी पत्रकार निलेश फिरके, उज्वला बागुल, संजीव काशीव, मनोहर लोणे, राकेश कोल्हे, वासेफ पटेल, श्रीकांत जोशी, डॉ.जगदीश पाटील, विशाल सूर्यवंशी, नाना पाटील, गोपाल भाई, भरत भाई, दिलीप भाई व अन्य बीके परिवार उपस्थित होते. सूत्रसंचालन बीके ज्योती दीदी तर आभार बीके अनिल भाई, मेडिटेशन बीके कविता बहन यांनी मानले.




