यावल तहसीलमध्ये निवासी नायब तहसीलदार बी.एम.पवार रूजू


यावल (8 ऑगस्ट 2025) : यावल तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर पदोन्नती घेत बी.एम.पवार यांनी येथील निवासी नायब तहसीलदारांचा पदभार स्वीकारला.

बी.एम.पवार हे यापूर्वी मंडळ अधिकारी म्हणून बोदवड येथे कार्यरत होते. त्यांची पदोन्नती झाली. आता यावल येथील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपण पारदर्शक कारभार व वेळेत नागरिकांचे कामांवर अधिक भर देऊ, असे प्रसंगी सांगितले. त्यांचे येथे स्वागत प्रांताधिकारी बबन काकडे, तहसीलदार मोहनमाला नाझीरकरसह कर्मचार्‍यांनी केले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !