भुसावळातील ब्राम्हण संघाच्या 101 व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम

भुसावळ (9 ऑगस्ट 2025) शंभश्र वर्षांचा वारसा असलेल्या ब्राह्मण संघातर्फे 101 व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांसह गुणवंत विद्यार्थी व प्रतीथयश प्राप्त समाज बांधवांचा सत्कार करण्यसात आला.
या कार्यक्रमांमध्ये 3 ऑगस्ट रोजी श्री दत्तयाग कार्यक्रम प.पू. नाना महाराज तराणेकर त्रिपदी परिवार यांनी राबविला. यावेळी सरिता देशपांडे व त्यांच्या सहकार्यांनी पूर्ण विधी राम राजुरकर व जितेंद्र आठवले यांच्या पौरोहित्याद्वारे पार पडला तर 5 रोजी सकाळी 8.30 वाजता चिंतामणी गणेश मंडळाचे सहकार्याने श्री गणपती अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम अमृत ढाके, रामभाऊ गचके आणि सहकारी यांनी सादर केला. यावेळी ब्राह्मण संघाचे ज्येष्ठ सभासद उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता संघाच्या 101 व्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी व प्रतीथयश प्राप्त समाज बांधवांचा गौरव करण्यात आला.

यांची प्रमुख उपस्थिती
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सुषमा खानापूरकर होत्या. व्यासपीठावर संघांचे अध्यक्ष गणेश वढवेकर, उपाध्यक्ष गजानन जोशी, सचिव महेंद्र गोडबोले, कोषाध्यक्ष आमोद टेंभुर्णीकर उपस्थित होते. यावेळी डॉ.खानापूरकर यांच्याहस्ते गुणवंत विद्यार्थी व यश प्राप्त समाज बांधवांचा गौरव करण्यात आला.
यावेळी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मराठी, इंग्रजीसह संस्कृत भाषेलाही आत्मसात करण्याचे मत व्यक्त केले. तर अध्यक्ष गणेश वढवेकर यांनी संघांतर्फे राबविण्यात येणारे उपक्रमाबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन अतुल जोशी यांनी केले. यशस्वीतेसाठी संघांचे डॉ.रमेश जोशी, प्रसन्न गंधे, संजय बोचरे, तुषार कुलकर्णी, जयंत जोशी, सौ.वैशाली एकलारकर, कल्पना दामले यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.
