भुसावळात रेल्वे कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यासाठी डीआरएम कार्यालयासमोर आंदोलन


Protest in front of DRM office for various demands of railway employees in Bhusawal भुसावळ (9 ऑगस्ट 2025) :  रेल कामगार सेनेच्या भुसावळ मंडळातर्फे शुक्रवारी जागतिक क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कर्मचार्‍यांच्या विविध ज्वलंत समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनकर्त्यांनी 12 महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन डीआरएम यांना दिले.

केंद्रीय अध्यक्ष विनायक राऊत, सरचिटणीस दिवाकर देव, कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, कार्याध्यक्ष प्रितमकुमार टाक,सचिव राजेश लखोटे,सहसचिव विनोद चाचे, खजिनदार योगेश माळी यांच्या नेतृत्वाखाली मागण्या मांडण्यात आल्या.





डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता धरणे आंदोलन करून कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविल्या जात नसल्यानबद्दल रेल्वे प्रशासनाच्या विरूध्द घोषणाबाजी करण्यात आल्या. यावेळी भुसावळ विभागातील रेल कामगार सेनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य मागण्या अशा
डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, एमएसीपी योजनेतील गैरप्रकार थांबवून पारदर्शक कारवाई करावी. नव्या पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करावी. संवेदनशील पदांवरील कर्मचार्‍यांचे नियमित व पारदर्शक बदली धोरण राबवावे. कॉन्ट्रॅक्ट कर्मचार्‍यांनाही बायोमेट्रिक उपस्थिती व 8 तास कामाचे नियम लागू करावेत. कार्यस्थळी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करावी. स्टेशनरी साहित्याची नियमित उपलब्धता सुनिश्चित करावी पात्र कर्मचार्‍यांना एफआरसी सुविधा द्यावी. रेल्वे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या उपस्थितीचा बोर्ड लावावा व औषधांवर सेवनाविषयी माहिती असलेला स्टिकर चिकटवावा.

ऑन ड्युटी किंवा पासवर प्रवास करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी डीआरएम कार्यालयात आरक्षण खिडकी सुरू करावी. दर महिन्याला सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा सत्कार करावा आदी मागण्यांचे निवेदन डीआरएम यांना दिले. रेल कामगार सेनेने या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा यांनी दिला आहे. डीआरएम कार्यालयाच्या बाहेर कर्मचार्‍यांनी घोषणाबाजी केली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !