नांदगाव यार्डमध्ये मालगाडी घसरली : अप रेल्वे लाईन दोन तास ठप्प

राजधानी, सचखंडसह अर्धाडझन गाड्या धावल्या उशिराने : प्रवाशांचे हाल


Goods train derails at Nandgaon yard : Up railway line closed for two hours भुसावळ (9 ऑगस्ट 2025)  : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदगाव रेल्वे यार्डामध्ये शुक्रवारी सकाळी 7.08 वाजता भुसावळ-दौंड मार्गावर धावणार्‍या मालगाडीचा रिकामा डबा (कोच) लूप लाईन क्रमांक एकवर जात असताना अप मेन लाईनवरील पटरीवरून घसरला. या डब्याची पुढील चार चाके घसरल्याने डबा अप मेल लाईनवर अडकला आणि गाडीचे जोड तुटले. यामुळे मुंबईकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेससह सुमारे अर्धा डझन रेल्वे गाड्याया दोन तास थांबून होत्या.

भुसावळात वाजले धोक्याचे सायरन
नांदगाव रेल्वे यार्डात जात असलेली डीडी बीएसएफसीएम नावाची मालगाडी एकूण 62 डब्यांची असून त्यापैकी 54 डबे लूप लाईनमध्ये गेले होते तर उर्वरित सात डबे मुख्य लाईनवरच होते. डबा घसरल्याने गाडीचे आठ डबे वेगळे झाले. लोको पायलट आर.के.यादव व सहायक लोको पायलट विवेक कुमार यांनी तत्काळ याची माहिती वरिष्ठांना दिली. यामुळे धोक्याचे सायरन भुसावळात वाजविण्यात आले. यामुळे तात्काळ आपतकालिन यंत्रणा अलर्ट झाली.





सकाळीच रवाना झाली टीम
रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी हे तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. मनमाड येथून ब्रेक व्हेईकल टीम सकाळी 7.45 वाजता हिस्वल मार्गे नांदगावला रवाना झाली. सकाळी 9.03 वाजता री-रेलिंगचे काम पूर्ण झाले. त्यानंतर 8 डबे पुन्हा जोडून सकाळी 9.17 वाजता घटनास्थळावरून सुरक्षित रवाना करण्यात आले. सकाळी 9.19 वाजता अप मेल लाईन वाहतुकीसाठी सुरू झाली.

या कालावधीत अप मेल लाईनवरील गाड्यांची वाहतूक ठप्प झाली. गाड्यांना वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आले होते. यात निजामुद्दीन-मुंबई राजधानी एक्सप्रेस (22222) सकाळी 9.32 वाजता आणि सचखंड एक्सप्रेस (12715) सकाळी 9.42 वाजता घटनास्थळ पार करून पुढील प्रवासाला रवाना झाल्या. घटनास्थळी वरिष्ठ रेल्वे अधिकारी, अभियंते तसेच आरपीएफचे एकूण 19 अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.

या गाड्या धावल्या उशिराने
नांदगाव यार्डातील कामामुळे मुंबईकडे जाणार्‍या राजधानी एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, धुळे मुंबई एक्स्प्रेस, बनारस एलटीटी एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस या गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. गोवा एक्स्प्रेस भुसावळ जंक्शनवर थांबविण्यात आली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !